अबब…ट्रॅक्टरखाली चिरडून २० मेंढ्या ठार….

माजलगावः दि.१४(प्रतिनिधी) शहरापासून जवळच असलेल्या परभणी रोडवरील दुगड पेट्रोल पंपाजवळ उसाचे ट्रॅक्टर (Tractor) पलटी झाल्याने त्याखाली दाबून २० मेंढ्या ठार तर १७ मेंढ्या जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान घडली असून राष्ट्रीय महामार्गावर (NH) काही काळ ट्राफीक जाम झाला होता.

जयमहेश कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. २३ बी. ८४६५ हे परभणी पॉईंट कडून कारखान्याकडे जात असताना दुगड पंपाच्या जवळ मेंढ्यांचा कळप रस्त्याने जात होता. या ठिकाणी ट्रॅक्टरच्या (Tractor) ट्रॉलीने झोला मारला त्यामुळे ट्रॅक्टरची दोन नंबरची ट्रॉली ऊसासह पलटी झाली. या ट्रॉली खाली चिरडून २० मेंढ्या (Sheep) जागीच ठार झाल्या तर १७ मेंढ्या (Sheep) गंभीर जखमी झाल्या आहेत. या मेंढ्या रघुनाथ बिरु मुसळे रा. बु. सारोळा ता. पाथरी, विश्वनाथ बिरु मुसळे रा. उपळी ता. वडवणी, भागवत काशीनाथ मुसळे रा. बानेगाव ता. पाथरी यांच्या मालकीच्या होत्या. घटना घडतात येथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी उसाच्या मोळ्या उपसून काढत खाली दबलेल्या मेंढ्याना बाहेर काढले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले व राष्ट्रीय महामार्गावर (NH) पडलेली ट्रॉली व ऊस जेसीबी च्या साहाय्याने बाजूला सारून वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळी समाजकल्याण सभापती कल्याण आबुज, तुकाराम येवले, ओबीसी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विलास नेमाने, युवा मल्हार सेनेचे अध्यक्ष संतोष देवकते, अशोक नवघरे आदींनी जाऊन मदतकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!