कोरोंना विशेष
कोरोनाचा आणखी एक बळी;

किल्लेधारूर दि.२७(वार्ताहर) तालुक्यातील ६१ वर्षीय वृध्दाचे अंबाजोगाई येथे कोरोनावर उपचार सुरु असताना आज दि.२७ गुरुवार रोजी पहाटे निधन झाले. तालुक्यात आजवर कोरोनामुळे ५ मृतांची नोंद झाली आहे.
दि.२५ रोजी तालुक्यातील कारी येथील एका रुग्णास उपचारासाठी अंबाजोगाई येथे दाखल करण्यात आले होते. सदरील रुग्णाचा स्वॅब अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्याच्यावर अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात उपचार सुरु होते. आज दि.२७ गुरुवार रोजी पहाटे त्याचे कोविड-१९ मुळे निधन झाले. यामुळे धारुर तालुक्यातील कोविड-१९ मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५ झाली आहे.