कोरोनामुळे अणुशास्त्रज्ञ डॉ. शेखर बसू यांचे निधन

कोलकताः दि.२५- ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. शेखर बसू (६८) यांचे कोरोना संसर्गामुळे गुरुवारी पहाटे ४.३० वाजता कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.
डॉ. बसू यांना २०१४ साली पद्मश्री उपाधी देवून गौरवण्यात आले होते. २०१२ साली डॉ. बसू यांनी भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्राचे (बीएआरसी) संचालक म्हणून सूत्रे स्वीकारली. तारापूर व कलपक्कम येथील ‘न्यूक्लियर रिसायकल प्लांट’ यांचा आराखडा, बांधकाम व संचालन यात त्यांची मोलाची कामगिरी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉ. बसू यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.