डोक्यात दगड घालून एकाचा खून… बीड मधील घटना

बीडः दि.११(प्रतिनिधी)- बीड (Beed) शहरातील चऱ्हाटा रोडवरील कालिका नगर भागात एका खाजगी वाहन चालकाचा डोक्यात दगड घालून खून (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याच्या विरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्रकाश बळीराम गायकवाड (३२) असे मयताचे नाव आहे. सोमवारी सकाळी कालिका नगर भागातील मोकळ्या मैदानात सदरील व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. याभागातील नागरीकांनी पोलिसांना माहिती देताच शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक साईनाथ ठोँबरे, बीड (Beed) ग्रामीण चे पोलिस निरिक्षक संतोष साबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याच्या विरोधात खुनाचा (Murder) गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी (Police) घटनास्थळाचा पंचनामा करत तपासाची चक्रे वेगात फिरवली आहेत.