साळेगाव क्राईम स्टोरी….महिलेचा गळा आवळून खून…. अशी घडली घटना

( केज तालुक्यातील साळेगाव येथील घटना )

केज दि.१ – शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या २४ वर्षीय महिलेचा अज्ञातांनी गळा आवळून आणि कपाळावर मारून निर्घृणपणे खून Murder  केल्याची घटना केज तालुक्यातील साळेगाव शिवारात शुक्रवारी ( ता. ३० ) सकाळी १२.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती. घटनास्थळी मृतदेह विवस्त्र अवस्थेत पडला होता. केज पोलिसांनी Kaij Police अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन अवघ्या काही तासात दोन आरोपींना अटक केली आहे.

साळेगाव येथील आश्विनी समाधान इंगळे ( वय २४ ) ही महिला शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास स्वतःच्या दस्तगिराचा माळ नावाच्या शेतात कापूस वेचणीसाठी गेली होती. शेतात गेल्यानंतर या महिलेने कापूस वेचून ढिगारा घालून ठेवला होता. त्यानंतर अज्ञात मारेकऱ्यांनी आश्विनी इंगळे यांचा गळा आवळून आणि कपाळावर दगड मारून निर्घृणपणे खून Murder केला. मारेकऱ्यांनी आश्विनी इंगळे यांचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह शेजारी शेतकरी राहुल शामराव जाधव यांच्या कापसाच्या शेतात टाकून देऊन पसार झाले. तर मारेकऱ्यांसोबत झालेल्या झटापटीत त्यांच्या अंगावरील शर्ट आणि ब्लाउजच्या गुंड्या तुटून घटनास्थळी पडल्या होत्या. मृतदेहाजवळ दगड, स्कार्फ पडलेला होता. तर मृतदेहापासून काही अंतरावर कानातील एक दागिना, हेअर पिन, वेचुन ठेवलेला कापूस, विळा, जेवणाचा डब्बा, गुटख्याची रिकामी पुडी, पायातील एक बूट व दुसरा बूट काही अंतरावर पडलेला होता.

या घटनेची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित पाटील, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, फौजदार श्रीराम काळे, फौजदार दादासाहेब सिद्धे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील तपासणी पथक, आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. मयत महिलेचे वडील सर्जेराव भीमराव सोनवणे ( रा. सारणी ( आ. ) ता. केज ) यांच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरुद्ध केज पोलिसात Kaij Police खुनाचा गुन्हा दाखल झाला. सदरील घटना घडल्यानंतर महिलेच्या माहेरकडील लोकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत जोपर्यंत आरोपीला अटक करण्यात येत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गुन्ह्याचा छडा लावला. नंतर नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले.

त्या’ महिलेचा अत्याचार करून खून

२४ तासाच्या आत पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असता सदरील महिलेवर अत्याचार करून हत्या Murder केला असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी दिली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व केज पोलिसांनी Kaij Police जलद गतीने तपास सुरू करून धनंजय उर्फ अजय दत्ता  इंगळे व पंकज भगवान जाधव या दोघा संशयितांना मोबाईल लोकेशन वरून ताब्यात घेतले असता त्यांनी अत्याचार करून हत्या केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपी अटक करण्यात आले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची व ३७६ नुसारही गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले.

आज कोर्टा समोर उभे करणार……!

सदरील घटनेतील अटक करण्यात आलेल्या दोघां आरोपीना कोरोना टेस्ट करून आज कोर्टा समोर हजर करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!