शैक्षणिक
बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

पुणेः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने बारावीच्या निकाला बाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निकाला बाबत संभ्रम निर्माण झाला होता. आज सिबिएसई चा निकाल जाहीर झाला आहे.
उद्या दि.१६ जुलै २०२० गुरुवार रोजी दुपारी एक वाजता अॉनलाईन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सर्व विद्यार्थी व पालकांना www.mahresult.nic.in व www.hscresult.mkcl.org या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.