कोरोंना विशेष

घरातच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

किल्लेधारूर दि.१४(वार्ताहर) शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती व प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत असुन अनेकांनी घरातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती साजरी केल्याचे दिसत आहे.

जगभर कोरोना वायरसने थैमान घातले असुन भारतातही याची साथ पसरली आहे. २१ दिवसांच्या लॉकडाऊन नंतर आजच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुढे आणखी २१ दिवस दि.३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहिर केले आहे. या लॉकडाऊनच्या काळात सर्व सण, उत्सव रद्द करण्यात आली आहेत. याचाच भाग म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती घरातच साजरी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. येथील सार्वजनिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मण सिरसट यांनीही घरातच जयंती साजरी करण्याचे आवाहन केले होते. आज दि.१४ मंगळवार रोजी शहरातील विर पांडूरंग चौक परिसरात ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष विजय गायसमुद्रे यांनी सर्वप्रथम घरात कुटूंबासह जयंती साजरी केली. जवळजवळ सगळ्यांनीच घरात जयंती साजरी करण्याकडे कल दाखवत प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याचे दिसुन आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!