चक्क पोलिस ठाणे लॉकडाऊन….आज ४५ स्वॅब अहवालाची प्रतिक्षा;

किल्लेधारूर दि.१०(वार्ताहर)आज दोन पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्यामुळे धारुर पोलिस ठाणे बंद करण्यात आले आहे. काल ४५ लोकांचे थ्रोट स्वॅब येथील कोविड केअर सेंटरमधून अंबाजोगाई प्रयोगशाळेत पाठवण्यात आली असुन आज रात्री त्यांचा अहवाल प्राप्त होणार आहे.
शहरात गेल्या दहा दिवसांपासून दररोज पॉझिटीव्ह रुग्ण सापडत आहेत. यामुळे सर्वांचेच लक्ष येणाऱ्या अहवालाकडे लागले आहे. काल येथील कोविड केअर सेंटरमधून अंबाजोगाई प्रयोगशाळेत ४५ लोकांचे स्वॅब पाठवण्यात आले आहेत. आज दोन पोलिस कर्मचारी पॉझिटीव्ह आढळून आली आहेत. शहरात रुग्ण आढळून येत असली तरी संसर्ग मात्र अत्यल्प आहे. शहरात गेल्या चार दिवसांपासून व्यापाऱ्यानी स्वंयस्फुर्तिने कडकडीत बंद पाळला आहे. येथील ठाण्यातील अनेक कर्मचारी बाहेर गावहून येणे जाणे करतात. केज व अंबाजोगाई येथुन ये जा करणाऱ्या दोन पोलिस कर्मचारी आज पॉझिटीव्ह आली. कर्मचाऱ्यांचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाकडून चक्क पोलिस ठाणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आरोग्य विभागाकडून पुन्हा पोलिस कर्मचाऱ्यांची स्वॅब तपासणी होण्याची शक्यता आहे.