धारुरात कोरोना पेशंट पळाला? आरोग्य प्रशासनाकडून खुलासा.

किल्लेधारूर दि.2 एप्रिल – शहरातील ग्रामीण रुग्णालयात सुरु असलेल्या कोरोना तपासणी केंद्रात पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णाने पलायन केल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत आरोग्य प्रशासनाकडून माहिती घेतली असता तपासणी केंद्रात असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे.

(Corona patient ran away in Dharur? Disclosure from Health Administration.)

शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोविड-19 तपासणी केंद्र मागिल चार महिन्यापासून सुरु आहे. आज दि.2 एप्रिल रोजी या तपासणी केंद्रात ॲन्टीजन चाचणी केल्यानंतर पॉझिटीव्ह (Corona Positive) आलेला एक रुग्ण केंद्रावरुन पळून गेला. सदरील बाब आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्याचा शोधाशोध घेण्यात आल्याची चर्चा होती.

याबाबत आरोग्य प्रशासनाकडून माहिती घेतली असता असा कुठलाही प्रकार झाला नसल्याचा खुलासा करण्यात आला. पॉझिटीव्ह (Corona Positive) आढळून येणाऱ्या रुग्णांना वेगळे करुन त्यांना लोखंडी सावरगाव येथील कोविड केअर सेंटरकडे (Covid care center) रुग्णवाहिकेतून पाठवले जाते. रुग्णासाठी त्याच्या गरजेच्या वस्तू आणण्यासाठी सवड दिली जाते. यामुळे गैरसमजातून अशी चर्चा होवू शकते असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन आदमाने यांनी सांगितले.

दरम्यान, शासनाने लक्षणे नसणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी गृह विलगीकरणाची सवलत दिलेली असून शहरात सध्या 17 रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. आज येथील कोविड केअर सेंटरची (Covid care center) पुर्ण तयारी झाली असून उद्या दि.3 पासून याठिकाणी 40 रुग्णांची सोय होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!