कोरोंना विशेष
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक; २५ पॉझिटीव्ह

बीडः मध्यरात्री एक वाजता आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे स्पष्ट झाले असुन एकुण २५ पॉझिटीव्ह रुग्णांची एकाच वेळी भर पडली आहे.
रात्री आलेल्या माहितीनुसार बीड शहरात ६ व तालुक्यात ३ असे ९ तर परळी शहरात सर्वाधिक १२ नवीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळली आहेत. याशिवाय गेवराई, आष्टी, माजलगाव व अंबाजोगाई येथे प्रत्येकी १ अशा २५ नवीन रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात सामाजिक संक्रमण वाढत असल्याचे दिसत आहे. आढळून आलेल्या रुग्णात ८ नवीन तर १७ जन पॉझिटीव्ह रुग्णाच्या सहवासित किंवा संपर्कातील आहेत. यात १३ पुरुष तर १२ महिला संक्रमित आहेत.