जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही चार कोरोना पॉझिटीव्ह

बीड:- जिल्हयातील आज एकूण 67 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते यापैकी बीड शहरातील चार जनांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
कोविड-19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील थ्रोट स्वॅब स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते. यात कालचे 3 प्रलंबित समाविष्टआहेत. या सर्वांचा अहवाल आला असून जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आलेले आहेत. आज आलेल्या अहवालात बीड मधील छोटी राज गल्लीतील चार व्यक्तींना लागण झाली आहे. यात ३० वर्षे वयाच्या महिलेसह 38 व 27 वर्षाचे पुरुष व 10 वर्षे वयाच्या मुलाचा समावेश आहे.