जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांची धारुरला भेट

किल्लेधारूर दि.३(वार्ताहर) बीड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी कोविड १९ च्या तयारी बाबत भेट देत विविध उपाय योजनेची माहिती घेतली.
धारुर शहर सध्या कन्टोन्मेंट झोन आहे. शहरात एक रुग्ण आढळून आल्याने संचारबंदी लावण्यात आलेली आहे. या काळात कोविड १९ बाबतीत करण्यात आलेल्या उपाययोजनाचा आढावा अजित कुंभार यांनी घेतला. कुंभार यांनी गटविकास अधिकारी सोपान अकेले, नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी सुहास हजारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन आदमाने यांची बैठक घेत माहिती घेतली व मार्गदर्शक सुचना केल्या. या भेटित पंचायत समिती, ताप उपचार केंद्र, कोविड १९ केयर सेंटर, ग्रामीण रुग्णालय आदी ठिकाणी भेटी दिल्या. आज रात्री ४० अहवालाची प्रतिक्षा असल्याने संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठीची तयारी यावेळी पाहण्यात आली.