कोरोंना विशेष

ग्रामीण भागात पॉझिटीव्ह संख्या वाढली….पहा किती व कुठले आहेत रुग्ण….

किल्लेधारूर दि.४(वार्ताहर) धारुर तालुक्यातील आजच्या तपासणीत कोरोना (Corona) बाधितांची संख्या ९ आहे. काल पाठवलेली १२ स्वॅब (swab) पैकी २ अहवाल पॉझिटीव्ह तर एक अनिर्णित आली आहेत. तर ३५ ॲन्टीजन तपासणीत ४ जन पॉझिटीव्ह आढळली आहेत. तर वडवणीत ३ रुग्ण धारुर तालुक्यातील आढळली आहेत. आजच्या रुग्ण संख्येत ग्रामीण भागातील संख्या जास्त आहे.

आज पुन्हा धारुर तालुक्यात ९ पॉझिटीव्ह रुग्ण आढळली आहेत. यात धारुर शहरातील ३, तालुक्यातील पहाडी पारगाव येथील ३ तर रुईधारुर येथील १ चोरांबा १ व पांगरी या गावातील एकाचा समावेश आहे. ३५ ॲन्टीजन (Anigen) तपासणीत ४ जन कोविड (Covid-19) पॉझिटीव्ह आढळून आली आहेत. तर काल पाठवलेल्या १२ स्वॅब (swab) नमुन्या पैकी दोन अहवाल व वडवणीत ३ पॉझिटीव्ह आली आहेत. काल पाठवलेल्या रुईधारुर येथील एका ५३ वर्षीय पुरुषाचा स्वॅब (swab) अहवाल अनिर्णित आहे.

ॲन्टीजन (Anigen) चाचणीतील कोरोना (Corona) पॉझिटीव्ह

१. ४७ वर्षीय पुरुष, तेलगाव रोड, धारुर

२. ३० वर्षीय पुरुष, पांगरी, ता.धारुर

३. ७५ वर्षीय स्त्री, पाटील गल्ली,धारुर

४. ५६ वर्षीय पुरुष, चोरांबा, ता.धारुर

स्वॅब (swab) नमुन्यातील पॉझिटीव्ह

५. २३ वर्षीय स्त्री, रुईधारुर, ता.धारुर

६. २५ वर्षीय पुरुष, आझाद नगर, धारुर

वडवणी येथे पॉझिटीव्ह आढळलेले

७. २५ वर्षीय स्त्री, पहाडी पारगाव, ता.धारुर

८. ७२ वर्षीय पुरुष, पहाडी पारगाव, ता.धारुर

९. ५५ वर्षीय स्त्री, पहाडी पारगाव, ता.धारुर

यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!