भोळसर पती असल्याने सासरचा होता त्रास; अखेर विवाहितेचा खून…? माजलगावातील घटना.

माजलगाव दि.11 सप्टेंबर – माजलगाव (Majalgoan) तालुक्यातील मारफळा तांडा येथील विवाहितेचा खून केला असल्याची तक्रार नातेवाईकांनी केली आहे. पती भोळसर असल्यामुळे सासरकडील मंडळीकडून वारंवार त्रास दिला जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

(Trouble for father-in-law for being a naive husband; Murder of a married woman …? Incidents in Majalgaon.)

माजलगाव गढी रोडवर असलेल्या मारफळा तांडा येथील मीना संतोष राठोड (वय 35) हिला सासरकडील मंडळीकडुन शुक्रवारी संध्याकाळी 4-5 वाजण्याच्या सुमारास मारहाण करून तिला तालखेड येथील ग्रामीण रुग्णालयात रात्री उपचारासाठी घेऊन गेले. त्यावेळी डॉक्टरांनी ती मयत झाली असल्याचे घोषित केले.

दरम्यान मिना हिच्या माहेरकडील मंडळींनी मीनाचा नवरा भोळसर असल्यामुळे तिचा दीर, जाऊ , सासरे, मामी सासरे आदी मंडळी करून मीनाला वारंवार त्रास दिला जात असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. विलास प्रभाकर राठोड हे वाहक म्हणून नोकरी करत असून त्यांच्याकडे काही वर्षापूर्वी रेशन दुकान होते. ते रेशन दुकान त्याने आठ वर्षांपूर्वी भाऊ संतोष त्याच्याकडे दिली होती.

मागील दोन-तीन वर्षापासून तो ही दुकान परत मागत होता. या कारणावरून भावा भावात सतत भांडण होत असे. यामुळेच तिचा खून केला असल्याचा आरोप मयत मीनाचे वडील पंडीत जाधव यांनी पोलिसांकडे (Police) केला आहे. हा खून (Murder) की आत्महत्या (Suicide) याबाबत शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच ही बाब उघड होणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!