तुर, हरभरा शासकीय खरेदी केंद्र सकाळी होणार सुरु

किल्लेधारूर दि.२९ ( वार्ताहर) धारूर व केज तालुक्यातील तुर, हरभरा शासकीय खरेदी केंद्राचा प्रत्यक्ष खरेदीस उद्या रविवारी सकाळी सुरुवात होत आहे.

तालुक्यातील तुर व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या पीकाची यापुर्वीच खरेदी विक्री संघाकडे नोंदणी केलेली आहे. यात केज व धारूर दोन तालुक्यातील सहा हजार तीनशे तुर उत्पादक शेतकऱ्यांनी तर तीन हजार पाचशे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. या खरेदी केंद्रावर एफ सी आय कडुन शासकीय तुर व हरभरा खरेदी केली जाणार आहे. खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या मालाची ग्रेडींग करण्यासाठी ग्रेडर उपलब्ध नसल्याने त्यातच कोरोना व्हायरसमुळे लाॅकडाऊन जाहिर केल्याने या खरेदीस उशिर झाला होता. ग्रेडर उपलब्ध झाल्यानंतर गुरूवार दि.३० एप्रिल पासुन धारूर येथील खरेदी विक्री संघाच्या शासकीय खरेदी केंद्र चालु होणे अपेक्षित होते. मात्र काही तांत्रिक अडचणी व ग्रेडर शिवाय एफसिआय कडून येणारी इतर तंज्ञ लोक हजर नसल्याने केंद्र सुरु होण्यास उशीर झाल्याची माहिती कळाली. उद्या सकाळी मात्र प्रत्यक्षात खरेदीस सुरुवात होत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ठरवुन दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल. जसे सोशल डिस्टटंन्स, माल घेऊन आलेल्या शेतकरी तसेच येथील कर्मचारी यांच्या तोंडाला मास्क, सॅनेटायझर आदिची पुर्तता करून कोणतीही गर्दी होणार नाही याची दक्षता घेत पुर्वी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचाच माल नोंदणी प्रमाणे खरेदी केला जाईल. तालुक्यातील तुर, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला माल खाजगी व्यापाऱ्यांना न देता शासकीय खरेदी केंद्रावरच आणुन सहकार्य करावे. असे आवाहन ही एम.एम. चोले यांनी केलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!