कोरोंना विशेष

दिलासादायक वृत्त…. जिल्ह्याचे मीटर डाऊन

बीडः दि.२०(वार्ताहर) गेल्या अनेक दिवसानंतर आज बीडकरांना दिलासा मिळाला असुन काल पाठवलेली ५४७ अहवालापैकी केवळ ३९ स्वॅब अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे कोरोनाची साखळी तुटत असल्याचे दिलासादायक स्थिती दिसत आहे. यात धारुरमध्येही केवळ एक सहवासित व्यक्ती पॉझिटीव्ह आढळून आली आहे.

जिल्ह्यात गेली अनेक दिवस कोरोनाचा कहर दिसुन आला. दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांमुळे लोकांत चिंतेचे वातावरण होते. काल जिल्हाभरातील स्वॅब केंद्रातून ५४७ स्वॅब पाठवण्यात आली होती. यापैकी ५०८ अहवाल निगेटिव्ह, ३९ पॉझिटीव्ह आली आहेत. यामुळे जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे. मात्र जिल्ह्यात सुरु असलेल्या ॲन्टीजन टेस्टमधून मोठ्या प्रमाणात पॉझिटीव्ह आढळून येत आहेत. काल ॲन्टीजन मधून २३० रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आली आहेत. धारुरमधून ३७ स्वॅब पाठवण्यात आली होती यापैकी एक स्त्री वय २२ रा.संभाजी चौक पॉझिटीव्ह आली आहे. जिल्ह्यात बीड २०, अंबाजोगाई ६, केज, पाटोदा व आष्टी प्रत्येकी ३, धारुर व वडवणी प्रत्येकी १ असे रुग्ण आढळले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!