कोरोंना विशेष

संपर्कातील स्वॕब १ जूनला घेणार

किल्लेधारूर दि.३१(वार्ताहर) शहरातील बाधित रुग्णाच्या संपर्कातील हाय रिस्क असणाऱ्या व्यक्तींचे स्वॕब उद्या १ जून रोजी घेण्यात येणार आहेत.

दि.२८ रोजी शहरात एक कोरोना बाधित आढळून आला. यामुळे शहरात खळबळ उडाली होती. त्याच रात्री आरोग्य विभागाने बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यास सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सांयकाळ पर्यंत संपर्कात आलेल्या ५३ व्यक्तींचा शोध घेण्यात आरोग्य विभागाला यश आले. यातील ४० ते ४३ लोक जवळचे नातलग असून इतर बाहेरुन संपर्कात आलेले आहेत. या संपर्कात आलेल्या पैकी हाय रिस्क असणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींचे स्वॕब आयसीएमआरच्या निकषानुसार पाच दिवसांनंतर म्हणजेच उद्या सोमवार  १ जून रोजी घेण्यात येणार आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांच्या कडून मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!