धक्कादायक; अभिनेते सुशांत सिंह राजपूत यांची आत्महत्या

मुंबई दि.१४(वि.प्र.) अभिनेते सुशांत सिंह राजपूत यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. १४) दुपारी समोर आली. आत्महत्यामागचे कारण अद्याप समोर आले नसून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
छोट्या पडद्यावरुन सिनेमासृष्टीत नावाजलेला तरुण अभिनेता म्हणून सुशांतसिंह राजपूत यांची ओळख होती. भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटात एम.एस. धोनीची भुमिका त्यांनी साकारली होती. अनेक चित्रपटात भुमिका करत यशस्वी ठरलेल्या अभिनेते सुशांत सिंह राजपूत यांनी मात्र आज आपल्या मुंबईत वांद्रे येथे आपल्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघड झाले. अद्याप आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून मुंबई पोलिस घटनास्थळी दाखल झाली आहे.