भीषण अपघातात दोघे जागीच ठार, दोन गंभीर; केज शहराजवळ घडली घटना.

केज दि.10 नोव्हेंबर – केज (Kaij) शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या केज कळंब रोडवरील चिंचोली फाट्यानाजीक बलेनो आणि मोटारसायकल च्या अपघातात (Accident) दोघे जागीच ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज पहाटे घडली.
(Two killed on the spot in a horrific accident, two seriously; The incident took place near the town of Kaij.)
केज शहरातून दोन राष्ट्रीय महामार्ग (National Highway) जातात. यातील खामगाव सांगोला राष्ट्रीय महामार्ग क्र 548 सी या रस्त्यावर शहरापासून जवळच असलेल्या चिंचोली फाट्यावर आज दि.10 बुधवारी पहाटे 5 ते 6 च्या दरम्यान हा अपघात झाला.
मोटरसायकल क्र. एम.एच. 44 वाय 2153 व बलेनो कार क्र. एमएच 25 एएस 7590 यांची धडक झाली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. सदरील अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जखमी व मयतांचीही ओळख पटली नव्हती.
या भीषण अपघातात दोन पुरुष जागीच ठार झाले आहेत. तर एक महिला आणि एक लहान बालक गंभीर जखमी आहेत. सदरील घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. 108 रुग्णवाहिकेचे (Ambulance) चालक मकरंद घुले तसेच श्री. बारगजे यांनी तात्काळ जखमीना उपचारासाठी दाखल केले.