युवतीच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा; केज तालुक्यातील प्रकार.

केज दि.10 जानेवारी – आई-वडील बाहेरगावी गेल्याची संधी साधून एका नराधमाने घरात घुसून वाईट हेतूने युवतीचा हात धरून विनयभंग केल्याची घटना केज तालुक्यात घडली. याप्रकरणी केज पोलिसांत तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

(Three charged in molestation case; Types of Kaij taluka.)

याबाबत मिळालेल्या माहितीप्रमाणे, केज (Kaij) तालुक्यातील एका गावात एका 12 विज्ञान शाखेत शिकत असलेल्या 18 वर्षीय महाविद्यालयीन युवतीचे वडील ड्रायव्हर असून ते साखर कारखान्यावर कामाला गेले आहेत. दि.8 जानेवारी रोजी आई ही धारुर (Dharur) येथे नातेवाईकाकडे बाहेरगावी गेले होती. घरी ती व तीचा भाऊ हे दोघे घरी होते म्हणून त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांना सोबत घेऊन ते रात्री घरात झोपले होते.

त्या वेळी दि.9 जानेवारी रविवार रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास तिचा भाऊ हा घराचा दरवाजा उघडून लघुशंकेसाठी गेला होता. त्याची संधी साधून नराधम अक्षय संतोष जंगम रा. कोल्हेवस्ती, तांबवा याने घरात घुसून युवतीचा वाईट हेतूने हात धरून विनयभंग (molestation) केला. तिच्या अंगावरील कपडे फाडले. त्या नराधमाने तिला तू मला होकार दे नसता  तिच्या भावाला जीवे मारून टाकण्याची धमकी दिली.

त्यांची झटपट सुरू असताना युवतीने मदतीसाठी तिने तिच्या भावाला बोलविले. यामुळे आरोपीने पळ काढला. तिच्या भावाने त्याला धरण्याचा प्रयत्न केला असता तो शेजातील ज्वारीच्या शेतात पळून गेला. त्यावेळी त्याच्या सोबत इतर अनोळखी दोन इसम होते.

या प्रकरणी पीडित युवतीच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात अक्षय संतोष जंगम आणि त्याचे साथीदार यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु.र.न. 4/2022 भा.दं. वि. 354, 354(अ), 452, 506 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक (Assistant Police Inspector) शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाच्या महिला पोलीस (Police) नाईक रुक्मिणी पाचपिंडे या पुढील तपास करीत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!