कोरोंना विशेष

धारुरचा दुसरा धक्का…. कोरोनाचा दुसरा बळी

किल्लेधारूर दि.६(वार्ताहर) शहरातील कोरोनाग्रस्त व्यक्तीचे अंबाजोगाई येथे उपचार सुरु असताना निधन झाल्याचे वृत्त येत असून जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना बळीत धारुरचा हा दुसरा बळी ठरला आहे.

जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४० झाली आहे. शहरात वाढती रुग्ण संख्या चिंतेची बाब असुन प्रशासनाचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करणे हाच पर्याय आहे. चार दिवसांपुर्वीच शहरातील एका उपचार घेत असलेल्या रुग्णाचा अंत झाला होता. आज सांयकाळी ६ च्या सुमारास अंबाजोगाईत उपचार घेत असलेल्या दुसऱ्या एका वृध्दाचे कोरोनामुळे निधन झाले आहे. धारुरचा हा दुसरा कोरोना बळी ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!