धारुरच्या १९ स्वॕबच्या अहवालाची प्रतिक्षा

किल्लेधारूर दि.२२(वार्ताहर) तालुक्यात कोरोनाने मुंबईकरांच्या रुपाने प्रवेश केला असून या रुग्णांच्या संपर्कातील व इतर १९ स्वॕब नमुने पाठवण्यात आली असून त्यांच्या अहवालाची प्रतिक्षा धारुरकरांना लागली आहे.
गेल्या दोन दिवसात केज, वडवणी व धारुर तालुक्यात कोरोना रुग्णांची ओळख झाली आहे. यातील बहुतेक रुग्ण हे मुंबईहून परतलेली आहेत. काल आलेल्या अहवालात माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील ११ जनांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. याच अहवालात धारुर तालुक्यातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह होता. मुळात या रुग्णाच्या इतर कुटूंबातील व्यक्तींचा पॉझिटीव्ह रुग्णात समावेश आहे. धारुर तालुक्यातील कुंडी येथील पाच रुग्ण आहेत. एका रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कुंडी येथील कुटूंबियातील सहा सदस्य, इतर आठ व तेलगाव येथील दोघांचे असे एकुण १६ स्वॕब घेण्यात आले आहेत. तर धारुर येथून एका प्रकरणातील तीन आरोपीचे स्वॕब घेण्यात आली आहेत. अशी एकुण १९ स्वॕब स्व. विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत. यात कोरोना रुग्णाच्या संपर्कातील १६ स्वॕब असल्याने याच्या अहवालाची प्रतिक्षा लागून आहे.