बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट; देशाने ओलांडला 3 कोटी रुग्णसंख्येचा पल्ला.

बीड दि.23 जून – बीड (Beed) जिल्ह्यातील 4183 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 148 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 4035 जण निगेटिव्ह आली आहेत. वाढत असलेल्या संख्येमुळे गेल्या काही दिवसात चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. यात समाधानकारक अहवाल येत आहेत.

(Today’s Corona Update in Beed District; The country has crossed the 3 crore patient mark.)

अशी आहे तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी….
बीड-22, अंबाजोगाई-13, आष्टी-22, धारुर-4, गेवराई-28, केज-14, माजलगाव-5, परळी-0, पाटोदा-16, शिरुर-17, वडवणी-7 अशी आहे.

बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या (Corona Positive) संख्येत पुन्हा ब्रेक लागल्याचे दिलासादायक चित्र आहे. जिल्ह्यात काल ICMR कडून सीरो सर्वेक्षण करण्यात आले. वेगवेगळ्या ठिकाणाहून 500 जणांचे रक्त नमुने घेण्यात आले. लवकरच याचा अहवाल राज्य सरकारकडे मिळणार आहे.

राज्याला दिलासा…देशाने ओलांडला 3 कोटीची रुग्ण संख्या.
दरम्यान, राज्यात आज दिवसभरात 9 हजार 43 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 8 हजार 470 नवीन रुग्ण सापडले. राज्यात आतापर्यंत 57 लाख 42 हजार 258 जण कोरोनामुक्त झाले असून कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 95.9 टक्के इतके आहे. दिवसभरात 188 जणांचा मृत्यू झाला तर राज्यात मृत्युदर 1.98 इतका आहे. राज्यात सध्या 6 लाख 58 हजार 863 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर 4 हजार 196 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात सध्या 1 लाख 23 हजार 340 रुग्ण आहेत.

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) सलग काही दिवस घट पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा वाढ झाली. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत आठ हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 50 हजार 848 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 1 हजार 358 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. देशभरातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडाही आता तीन कोटींच्या पार गेला आहे. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!