कोरोंना विशेष
धारुरमध्ये आज पुन्हा ५ पॉझिटीव्ह; ५६ निगेटिव्ह

किल्लेधारूर दि.२२ आगस्टः- काल रात्री पाठवलेल्या ६१ अहवाला पैकी शहरातील २ व अंजनडोह येथील ३ जन पॉझिटीव्ह आली आहेत. यात १ नवीन तर इतर ४ सहवासित आहेत.
आज तालुक्यात २३ व्या दिवशीही ५ रुग्णांची भर पडली आहे. अंजनडोह येथील २० अतिजवळच्या हाय रिस्क संपर्कातील स्वॅब पैकी ३ अहवाल पॉझिटीव्ह आली आहेत. तर शहरात एक सहवासित व एक नवीन पॉझिटीव्ह आढळली आहेत. यात १) ३८ वर्षीय पुरुष (डोंगरवेस, धारुर शहर, नवीन)
२)१४ वर्षीय स्त्री,(जाधव गल्ली, धारुर शहर, सहवासित )
३)४५ वर्षीय पुरुष,(अंजनडोह ता. धारुर, सहवासित)
४)६५ वर्षीय स्त्री,(अंजनडोह ता. धारुर, , सहवासित)
५)६० वर्षीय पुरुष(अंजनडोह ता. धारुर, , सहवासित) यांचा समावेश आहे.