धारुरमध्ये कोविड योध्दे कोरोंटाईन; पोलिस, डॉक्टर व न.प. कर्मचाऱ्यांचा समावेश

किल्लेधारूर दि.५(वार्ताहर) शहरात गेल्या काही दिवसात झालेल्या कोविड-१९ च्या उद्रेकामुळे अनेक कोविड योध्द्यांना कोरोंटाईन होण्याची वेळ आली आहे. यात प्रामुख्याने पोलिस, डॉक्टर व नगर परिषदेचे कर्मचारी यांचा समावेश आहे.

धारुर शहरात गेल्या पाच दिवसात दररोज पॉझिटीव्ह रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे अर्धे शहर सध्या कंटेनमेंट झोनमध्ये रुपांतरीत झालेले आहे. शहरात एकुण ८ कंटेनमेंट झोन तर १४ ॲक्टीव रुग्ण आहेत. यातील शहरात एक दगावला आहे. अचानक उसळलेल्या उद्रेकामुळे मात्र अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे. यात स्वतः सहाय्यक पोलिस निरिक्षक, उपनिरिक्षक अशा चार पोलिस अधिकाऱ्यासह १६ पोलिस कर्मचारी, पाच डॉक्टर, चार नगर परिषद कर्मचारी कोरोंटाईन झाले आहेत. यातील अनेकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आलेली आहेत. तर काहींचे अहवाल निगेटिव्ह आली आहेत. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून जनतेच्या सेवेत असणाऱ्या डॉक्टर, पोलिस व नगर परिषदेच्या कोविड योध्द्यांना जायबंदी होण्याची वेळ आली आहे. यामुळे जनतेने वेळीच गांभिर्य ओळखून नियम पाळल्यास धोका टाळता येणार असल्याचे मत प्रशासनाकडून व्यक्त केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!