धारुर शहरातील हा भाग होणार आज सिल; कंटेनमेंट झोनची अंमलबजावणी सुरु. धारुरचे कोविड सेंटर फुल.

किल्लेधारूर दि.10 एप्रिल – शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. काल एकाच दिवसात 29 कोरोना बाधित आढळून आली आहेत. शहरातील ज्या भागात 5 किंवा 5 पेक्षा जास्त कोरोना बाधित (Corona Positive) आढळतील तो भाग पुर्वीप्रमाणे कंटेनमेंट झोन म्हणून सिल करण्यात येणार आहे. आज किल्लेधारूर शहरातील विर पांडूरंग चौक परिसर सिल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.

(This part of Dharur city will be sealed today; Implementation of containment zone started. Dharur’s Covid Center Full.)

बीड जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर होत चालली असून आता गाव व शहरात कंटेनमेंट झोन (Containment zone) करुन लोकांना प्रतिबंधित करण्याकडे प्रशासनाचा कल आहे. यातच संपूर्ण लॉकडाऊनचे (lockdown) संकट राज्यावर आलेले आहे. गेली काही दिवस लॉकडाऊनला (lockdown) विरोध होत असताना राज्य शासनाने नवीन नियमावली जाहिर करत कंटेनमेंट झोनची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

एकाच गल्लीत 5 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्याने शहरातील वीर पांडूरंग चौक परिसरात आज कंटेनमेंट झोन (Containment zone) करण्यात येणार आहे. याभागात स्थानिक आरोग्य व नगर पालिका प्रशासनाकडून सर्व्हे करण्यात येत असून आढळून आलेल्या रुग्णांच्या घरांनुसार प्रतिबंधित क्षेत्र जाहिर करण्यात येणार आहे. शहरात ज्या भागात रुग्ण संख्या 5 पेक्षा अधिक असेल त्या भागातही कंटेनमेंट झोन करण्यात येणार आहेत.

कोविड सेंटर फुल.
किल्लेधारूर तालुक्यात सध्या 127 ॲक्टीव रुग्ण आहेत. येथील कोविड केअर सेंटरची (Covid care center) वाढीव 100 बेड्स देखील अपुरे पडण्याची शक्यता असुन सध्या पर्यायी 50 वाढीव बेड्सची मागणी करण्यात आली आहे. सध्याच्या कोविड केअर सेंटरच्या (Covid care center) समोरच असलेल्या दुसऱ्या वस्तीगृहात ही पर्यायी व्यवस्था करण्याचे नियोजन स्थानिक प्रशासन करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!