कोरोंना विशेष

धारुरातही कर्फ्यू

लोकांनी लावला प्रवेश बंदीचा फलक

किल्लेधारूर दि.२८(वार्ताहर) बीड येथे आढळून आलेल्या पॉझिटीव्ह रुग्णाची छळ धारुरपर्यंत पोहोचली असून तालुक्यातील पारगाव या गावात संचारबंदी लावण्यात आली आहे. पारगाव ग्रामपंचायतनेही गावात प्रवेश बंदी केली आहे. सध्या पारगावात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

मध्य रात्री जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशावरुन जिल्ह्यातील बारा गावात संचारबंदी जाहिर करण्यात आली. बीड येथे काल आढळून आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील स्थळावर प्रशासनाने गांभिर्याने कारवाई केली आहे. बीड येथील विवेकानंद हॉस्पिटल सिल केले असून या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांनाही कोरोंटाईन करण्यात आले आहे. सोबतच रुग्णालयाशी संपर्क आलेल्या रुग्णांच्या नातेवाईक व संबंधित गावावरही आरोग्य यंत्रणा लक्ष देवून आहे. तालुक्यातील पारगाव येथील एक रुग्ण त्या रुग्णालयात उपचार घेत असल्याने पारगाव येथेही कर्फ्यू लावण्यात आला आहे. आरोग्य विभागाने संबंधित गावात पथक पाठवले असून पुढील कार्यवाही सुरु आहे. एका रुग्णामुळे मात्र बीड शहरासह बारा गावात दहशत पसरली असल्याचे दिसुन येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!