धारुर एक तर जिल्ह्यात २० पॉझिटीव्ह

बीड : शुक्रवारचा दिवस (दि. १०) बीड जिल्ह्यासाठी धक्कादायक ठरला आहे. शुक्रवारी जिल्ह्यात २० जणांचे तर धारुरच्या एक जनांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. शुक्रवारी बीड जिल्ह्यातून २९३ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी २० पाॅझिटीव्ह तर २७३ निगेटिव्ह आले आहेत.
बाधितात बीडमधील ०८, परळीतील ०४, गेवराईतील ०६, आष्टी आणि धारुर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. आज पहाटे आलेल्या पॉझिटीव्ह अहवालात सर्वाधिक बाधित बीड शहरातील तर त्या खालोखाल गेवराई मधील सहा व्यक्तींचा समावेश आहे. परळीत आज पुन्हा चार पॉझिटीव्ह आढळल्यामुळे परळीची संख्या झपाट्याने वाढत आहे. धारुर शहरातही पुण्याहून आलेला चौथा बाधित आढळल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. दरम्यान आजच्या संख्येने जिल्ह्याची आकडेवारी दोनशे पार झाली आहे.