धारुर शहरात एक तर जिल्ह्यात १६ पॉझिटीव्ह

बीडः रात्री आलेल्या अहवालात बीड जिल्ह्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा आज १६ ने वाढला आहे. आजच्या अहवालात धारुर शहरात पुन्हा एक रुग्ण आढळून आल्याने धारुर तालुक्यात ॲक्टीव रुग्णांची संख्या दोन झाली आहे.

रात्री साडे अकरा वाजता आलेल्या अहवालानुसार बीड शहरात ५ , परळी शहरात ६, अंबाजोगाई व गेवराईत प्रत्येकी २ पॉझिटीव्ह आढळली आहेत. तर धारुर शहरातील आयोध्या नगर येथील एक ७३ वर्षीय वृध्द १ अशा १६ नवीन रुग्णांची भर पडली आहे. यात ८ जन पॉझिटीव्ह रुग्णाच्या सहवासित किंवा संपर्कातील तर ८ रुग्ण नवीन आहेत. आजच्या अहवालात ९ पुरुष तर ७ महिला संक्रमित आहेत. धारुरमध्ये आढळून आलेल्या नवीन रुग्णामुळे धारुरकरांची धाकधूक वाढली आहे. मेन रोड, आयोध्या नगर हा भागात सतत गजबजलेला असल्यामुळे रुग्णाच्या सहवासातील शोध घेतला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!