कोरोंना विशेष

धारुर शहरात पुन्हा कोरोना बळी;मृत्यूदर अधिक

किल्लेधारूर दि.३०(वार्ताहर) शहरात दि.२८ रोजी  कोरोना पॉझिटीव्ह आढळून आलेल्या ६७ वर्षीय वृध्दाचा अंबाजोगाई येथे उपचार सुरु असताना निधन झाले. शहरातील चौथा तर तालुक्यातील हा सातवा बळी ठरला आहे.

दि.२८ आगस्ट शुक्रवार रोजी शहरातील एकाच भागातील दहा रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आली होती. सदरील रुग्णा पैकी वयोवृध्द असलेल्या रुग्णास अंबाजोगाई येथील विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले होते. लक्षणे असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. मात्र आज पहाटे एकच्या सुमारास त्यांचे निधन झाले. तालुक्यात आजवर ७ कोरोनाग्रस्त दगावली आहेत. शहरातील कोरोनामुळे दगावणारी ही चौथी व्यक्ती आहे. तालुक्यातील एकुण रुग्ण संख्येचा विचार केल्यास मृत्यूदर अधिक दिसुन येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!