धारुर शहरात ५ तर ग्रामीण भागात २; आजची पॉझिटीव्ह संख्या व कुठले आहेत रुग्ण पहा….

किल्लेधारूर दि.८ सप्टेंबर- आज केलेल्या ६८ ॲन्टीजन तपासणीत ४ जन तर इतर ठिकाणी तालुक्याचे ३ असे ७ पॉझिटीव्ह आली आहेत. यात धारुर शहरातील पाच जनांचा समावेश आहे.
आज तालुक्यात ३९ व्या दिवशी ७ रुग्णांची भर पडली आहे. आज येथील कोविड केअर सेंटरमध्ये ६८ जनांची ॲन्टीजन चाचणी करण्यात आली. यात शहरातील चौघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. काल तालुक्यातील भोपा येथील एकाचा पाठवलेला स्वॅब पॉझिटीव्ह आला आहे. तर भोगलवाडी येथील कालची नोंद आज झाली आहे. तालुक्यात आज ७ जन पॉझिटीव्ह आढळली आहेत. यात शहरातील
१. ३३ वर्षीय पुरुष शिनगारे गल्ली ,
२. १७ वर्षीय पुरुष केज रोड
३.३६ वर्षीय महिला आयोध्या नगर,
४. ५७ वर्षीय पुरुष उदयनगर,
५. ५६ वर्षीय महिला वडगावकर गल्ली (लातुर)
६. २७ वर्षीय पुरुष भोपा
७. २१ वर्षीय महिला भोगलवाडी
येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.