धारुर शहर वगळून जिल्ह्यात पुर्ववत शिथिलता सुरु

बीड दि.२५ (वार्ताहर) जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज बीड जिल्ह्यासाठी नवे आदेश जारी केले आहेत. विविध व्यवसाय व उद्योगांच्या कामकाजाविषयीचे यापुर्वीचे लॉकडॉऊन काळातील सर्व आदेश अधिक्रमीत करत कन्टेन्मेंट झोन वगळून दि.२६ च्या आदेशाप्रमाणेच सुरु राहणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी कळविले आहे.

नव्या आदेशात केवळ खालील बाबी पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधीत असतील.
सर्व विमानेसवा, शाळा, कॉलेज, शैक्षणिक प्रशिक्षण, शिकवणी केंद्र बंद राहतील. सरकारी कर्मचारी, पोलीस, आरोग्य कर्मचारी, अडकलेले व्यक्ती, प्रवासी, अलगीकरण कक्ष, विलगीकरण कक्ष, बसस्थानक, व रेल्वे स्थानकातील हॉटेल उपहारगृह वगळता सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट व इतर सेवा देणार्‍या अस्थापना बंद राहतील. रेस्टॉरंटला पार्सल सेवा देण्यासाठी सूट देण्यात येत आहे. सर्व हॉटेल ढाबे, चाट सेंटर, खानावळींना केवळ घरपोहोच सेवेसाठी परवानगी देण्यात येत आहे. सर्व सिनेमागृहे, मॉल, व्यायामशाळा, जलतरणिका, मनोरंजन, उद्याने, प्रेक्षागृहे सभागृहे बंद राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्य व जमावास बंदी राहील. सामान्य नागरिकांसाठी सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे बंद राहतील. धार्मिक परिषद, संमेलने जमाव यांना प्रतिबंध करण्यात येत आहे. क्रिडा संकूले, क्रिडांगणे व सार्वजनिक खुल्या जागा या वैयक्तिक व्यायामासाठी खुल्या राहतील. परंतु सोशल डिस्टंट पाळणे बंधनकारक करत व पाच पेक्षा जास्त ग्राहकांना एकत्र जमण्यास मज्जाव कायम राहणार आहे. शासकीय नियमाप्रमाणे सर्व बँका सुरु राहतील असे नवीन आदेशात सांगण्यात आले आहे. लग्न कार्यासाठी ५० पेक्षा जास्त तर अंत्यविधीसाठी २० पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित येण्यास बंदी राहील. जिल्ह्यातील कन्टेन्मेंट झोन यातून वगळण्यात आली आहेत. धारुर शहर सध्या कन्टेन्मेंट झोन असल्याने येथे संचारबंदी कायम राहिल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!