धारूर शहरात चोरट्यांचा मंदिरातील दानपेट्यांवर डल्ला

धारेश्वर व तुळजा भवानी मंदिरात चोरी

किल्लेधारूर दि.२६(वार्ताहर) धारूर येथील कसबा विभागात असलेले जागृत देवस्थान धारेश्र्वर मंदिरातील दान पेटीचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतील देणगी रक्कम मध्य रात्री पसार करत जवळच्याच तुळजाभवानी मंदिरातील दान पेटी चोरीच्या उद्देशाने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली.

धारेश्र्वर मंदिर हे पुर्वाश्रमीचे जैन मंदिर आहे. कालांतराने येथे शिवशंकरारी पिंड स्थापन करण्यात आली. याभागात धारेश्वर मंदिराचे अनेक भक्त असुन भक्तांनी येथे एक दानपेटी ठेवलेली आहे. जवळच नवीनच तुळजाभवानी मंदिर आहे. परिसरातील नागरिकांचे जागृत देवस्थान म्हणून मोठ्या भक्तीभावाने धारेश्वर मंदिर व तुळजाभावानी मंदिरात येत असतात. काल रात्री भुरट्या चोरी करणाऱ्या चोरांनी चोरीच्या उद्देशाने दान पेटीची चोरी केल्याचे दिसुन आले आहे. पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर तपास करून चोरांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी येथील नागरिकानी केली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोविंद बास्टे यांनी भेट देवून सर्व परिस्थितीची पाहणी केली आहे. धारूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!