नगर परिषदेकडून पहिल्या कोरोनाग्रस्त मयतावर अंत्यसंस्कार

किल्लेधारूर दि.२३ (वार्ताहर) धारूर शहरात कोरोना पॉझिटीव्ह असलेला रुग्ण मृत्यू झाल्यावर सर्व व्यवस्था करून व नियमाचे पालन करत धारूर नगर पालीका प्रशासनाने या मृताचे पोलीस स्टेशन मागिल स्मशान भुमित पहिले अंत्यसंस्कार मंगळवारी राञी उशीरा केले.
धारूर येथे मंगळवारी दुपारी एक रुग्ण गंभीर आजारी असल्याने ग्रामीण रुग्नालयात उपचारा साठी गेला असता तो तिथे मृत झाल्याचे लक्षात आले. त्यांने धारूर येथे खाजगी रुग्नालयात उपचार घेत असताना सोमवारी त्यांची कोरोना अॕटीजन टेस्ट करण्यात आली होती. माञ ती निगेटीव्ह आली त्यामुळे स्वॕब घेऊन अंबाजोगाई येथे तपासणी साठी पाठवण्यात आला होता. मंगळवारी सांयकाळचे वेळी त्यांचा रिपोर्ट आला. नेमक त्याच वेळी वैद्यकीय अधिकारी त्यांची तपासणी करत असताना तो मृत रुग्णांची स्वॕब टेस्ट पाॕजीटीव्ह आली. धारूर रुग्नालयात व शहरात होणारा हा पहिला मृत्यू होता. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन शेकडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. चेतन आदमाने यांनी सदरील बाब तहसीलदार वंदना शिडोळकर यांना कळविले. तहसील प्रशासनाने नगर परिषदेस अंत्यसंस्कार करण्याबाबत सुचना केली. नगर पालीकेने या मृताचे अंत्यसंस्काराची तयारी केली. सर्व नियमाचे पालन करत पोलीस स्टेशन मागील स्मशानभूमीत या रुग्नावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष डाॕ.स्वरूपसिंह हजारी, मुख्याधिकारी नितीन बागूल, अधिक्षक नितीन ईजाते पञकार राम शेळके, नोडल अधिकारी सचिन डावकर, बंजरंग शिनगारे हे व नगर परिषद कर्मचारी उपस्थीत होते.