छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीचा गळफास; बलात्कार करुन खूनाच्या आरोपामुळे खळबळ.

बीड दि.7 अॉगस्ट – बीड (Beed) जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात चुंबळी गावांमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सततच्या छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली असून नातेवाईकांच्या बलात्कार (Rape) करुन खून (Murder) केल्याच्या आरोपामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पाटोदा पोलिसांत (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(14-year-old girl strangled after being molested; Excitement over rape and murder charges.)

पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह, घरात गळाफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पाटोदा पोलीस ठाण्याचे (Police station) सहाय्यक पोलिस निरिक्षक (API) महेश आंधळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नातेवाईकांसह समाजातील नेत्यांनी, गावातील तरुणाने तिच्यावर अत्याचार करून तिला फासावर लटकवले असा आरोप केला होता.

घटनेचे गांभिर्य ओळखत पोलिसांनी मृत मुलीचे शवविच्छेदन इन कॕमेरा (In camera) करण्यासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात (SRTR) पाठवले. पाच डॉक्टरांच्या पथकासमोर शवविच्छेदन करण्यात आले आहे. याबाबतचा तपशील अद्याप उपलब्ध झाला नसून याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाईचे पाऊल उचलले आहे.

मयत मुलीच्या पित्याने रात्री पोलीसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, घरातील सर्वजण बाहेरगावी लग्नासाठी गेलो होतो. घरी परतल्यानंतर मुलगी फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. गावातील एका तरुणाकडून मयत मुलीसह तिच्या बहिणीची वारंवार छेड काढली जात होती. यापूर्वी त्या तरुणाने अश्लील चाळे केल्याने गावातील नागरिकांनी त्याला समज दिली होती. त्यानंतर तो तरुण मुलीला जिवे मारण्याच्या धमक्या देत होता. या दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी, गावातीलच उमेश क्षीरसागर (वय 30) या युवकाला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले असून त्याच्यावर कलम 305, पोस्को (POCSO) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!