ना. धनंजय मुंडे ठणठणीत, ब्रीच कँडीत दाखल- आरोग्य मंत्री टोपे

मुंबई-दि.१२(प्रतिनिधी) सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाली असून त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कोणतीही लक्षणं नाहीत असंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करत आहोत असं यावेळी त्यांनी सांगितलं. ना.धनंजय मुंडे यांचा एक रिपोर्ट निगेटिव्ह तर दुसरा पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना कोणतीही लक्षणं जाणवत नसून श्वसनाचा त्रास होत आहे. यासाठीच त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. ते फायटर आहेत लवकरच बरे होतील आणि पुन्हा एकदा सक्रीय होती असा विश्वास आहे असं यावेळी राजेश टोपे यांनी सांगितलं. दरम्यान बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्वतः ला कोरोंटाईन करत ना. मुंडे यांच्या संपर्कात आलेल्यांनीही स्वतःहून कोरोंटाईन व्हावे असे आवाहन केले आहे.