पञकारांचे नेते एस. एम. देशमूख यांचा सत्कार

वडवणी दि.१४(वार्ताहर ) मराठी पञकार परीषदेचे मुख्य विश्वस्त व पञकाराचे नेते श्री. एस.एम.देशमूख यांच्या  वाढदिवसाच्या निमीत्त पया  वतीने सत्कार करून गौरव करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कोरोना काळात वृत्तपञ व पञकारा पुढे निर्माण होणाऱ्या विविध प्रश्नावर चर्चा होऊन पञकारानी स्वतःची काळजी घेऊन काम करावे असे आवाहन एस एम देशमूख यांनी केले.

मराठी पञकार परीषदेचे मुख्यविश्वस्त पञकाराचे नेते राज्यातील पञकाराचे प्रश्नासाठी सतत जागृत पणे काम करणारे श्री एस एम देशमूख यांच्या वाढदिवसाच्या निमीत्त धारूर, वडवणी, तेलगाव, दिद्रूंड येथील पञकारानी एकञीत पणे देवडी येथे जाऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी पञकारांशी कोरोना चे काळात असणाऱ्या सर्व परीस्थीतीवर चर्चा करून वृत्तपञचे अडचणीवर चर्चा करण्यात आली. पञकारानी आपले काम करावे माञ स्वतःचि काळजी करत व सर्व नियमाचे पालन करत काम करावे असे आवाहन एस एम देशमूख यांनी यावेळी केले.
यावेळी मराठी पञकार परिषदेचे प्रसिध्दीप्रमूख अनिल महाजन, राज्य कार्यकारणी सदस्य अनिल वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष सय्यद शाकेर, सोशल मिडीयाचे संतोष स्वामी, महादेव देशमूख,  नागनाथ सोनटक्के, बालाप्रसाद जाजु, सुर्यकांत बडे, हनूमान बडे, अमोल ठोंबरे, अतुल शिनगारे, ईश्वर खामकर, दिनेश कापसे, सुग्रीव चोले आदी उपस्थीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!