आजही बिबट्याने घेतला ९ वर्षाच्या मुलीचा बळी

करमाळाः दि.७-करमाळा (Karmala) तालुक्यात बिबट्याने (Leopard) ऊसतोडणी कामगारांच्या नऊ वर्षाच्या मुलीवर हल्ला केल्याची घटना घडली. आज दि.७ सोमवारी  चिखलठाण येथे केडगाव शेटफळ सीमेवरती राजेंद्र बारकुंड यांच्या शेतामध्ये सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बिबट्याच्या (Leopard) तावडीतुन सुटका करुन तिला करमाळा (Karmala) येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. फुलबाई अरचंद कोडली असे या मृत मुलीचे नाव असून ती दुसाने तालुका साक्री जिल्हा धुळे येथील रहिवासी आहे. ऊसतोडणी चालू असताना ती इतर मुलीबरोबर खेळत होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!