प्रभागात अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप

किल्लेधारूर दि.७(वार्ताहर) धारुर शहरातील प्रभाग क्र.२ उदयनगर, लक्ष्मीनगर व प्रतीभानगर भागात नगरसेवक बाळासाहेब सोनटक्के यांनी अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्याचे सामान्य नागरीकांना वाटप केले.

शहरी भागातील नागरिकांची रोग प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून काकु नाना प्रतिष्ठान बीड व माजी मंञी जयदत्त क्षीरसागर यांच्या वतीने मोफत अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. शहरातील प्रभाग २ चे नगरसेवक बाळासाहेब सोनटक्के यांनी प्रभागातील उदयनगर, लक्ष्मीनगर व प्रतीभानगर भागात सर्वसामान्य नागरीकांना या गोळ्यांचे वाटप केले. यावेळी मनोज लोंखडे, तुळशीदास पवार, अवी कुंभार, अजय सोनटक्के, अभिजीत जगताप, जाधव इत्यादी यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!