कोरोंना विशेष
प्रलंबित पैकी पाच पॉझिटीव्ह; परळीत ४

बीडः काल प्रलंबित असलेल्या अहवालातील ३४५ स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला असून यात परळीचे चार तर अंबाजोगाई येथील एक जन पॉझिटीव्ह आढळून आला आहे.
गेल्या दोन दिवसात परळीसह बीड जिल्ह्यातून शेकडो स्वॅब पाठवण्यात आली. प्रलंबित पैकी २४५ स्वॅब अहवाल प्राप्त झाली आहेत. यात परळी येथील चार तर अंबाजोगाई येथील एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. ३४० अहवाल निगेटिव्ह तर ६२८ स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत. आज आलेल्या पॉझिटीव्ह पैकी परळीचे चार एसबीआय ग्राहक तर अंबाजोगाई चा पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासित आहे.