बिहार निवडणुकीचं बिगुल वाजलं… अशी होईल निवडणूक

पाटणाः– मुख्यमंत्री नितीश कुमार बिहारचा गड राखण्यात यशस्वी होणार की, लालू प्रसाद यादव यांचे धाकटे चिरंजीव तेजस्वी यादव यांचे पारडे जड होणार हे लवकरच स्पष्ट होणार असून आज निवडणूक आयोगाने निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे.
बिहार निवडणूक २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यात मतदान होणार असून १० नोव्हेंबरला मतमोजणी होईल.
पहिला टप्पा : मतदान – २८ ऑक्टोबर
पहिल्या टप्प्यात ७१ मतदारसंघात मतदान होईल.
दुसरा टप्पा : मतदान – ३ नोव्हेंबर
दुसऱ्या टप्प्यात ९४ मतदारसंघात मतदान होईल.
तिसरा टप्पा : मतदान – ७ नोव्हेंबर
तिसऱ्या टप्प्यात ७८ मतदारसंघात मतदान होईल.
बिहार विधानसभा २४३ सदस्य संख्येची आहे. नोव्हेंबरच्या २९ तारखेला बिहार विधानसभेची मुदत संपत आहे.
बिहारमध्ये एकूण ७ कोटी १८ लाख मतदार आहेत. त्यात ३ कोटी ७९ लाख पुरुष मतदार, तर ३ कोटी ३९ लाख महिला मतदार आहेत.