कोरोंना विशेष

बीडमध्ये परिचारिकेसह वृध्दाचा कोरोनामुळे मृत्यू

बीडः दि.२१ कोरोना योद्धा म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील ३८ वर्षीय परिचारिकेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी हाती आली आहे. तर बीड शहरातील ६२ वर्षीय व्यक्तीचाही मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे वृत्त येत आहे.

बीड जिल्हा रुग्णालयातील त्या परिचारिकेचा आजच कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. याबाबत अद्याप आरोग्य विभागाकडून अधिकृत माहिती जाहिर करण्यात आलेली नाही. कोरोनामुळे शहरातील एका ६२ वर्षीय वृध्दाचा औरंगाबाद येथे उपचार सुरु असतानाच निधन झाल्याचे कळते. जिल्ह्यात कोरोना बळींचा आकडा वरचेवर वाढत असल्याचे दिसुन येत आहे. काल तीन तर आज सलग दुसऱ्या दिवशीही कोरोनाचे दोन बळी गेले आहेत.

रृ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!