बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात ग्रुप अ‍ॅडमीनसह तरुणावर गुन्हा दाखल

मेसेज पाठवणारा व ग्रुप ॲडमीन रडारवर

बीड दि.६(प्रतिनिधी) आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाल्यांनतर जिल्ह्यात सोशल माध्यमातून कोणत्याही अफवा पसरु नये तसेच कोरोनामुळे जातीय तेढ निर्माण होईल अशी कुठलीही पोस्ट सोशल मीडियावर टाकू नका असे जिल्हाधिकारी यांचे आदेश काढलेले आहेत. असे असतांनाही एका तरुणाने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये ‘सरकारने दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे. अशी पोस्ट करुन अफवा पसरवली. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात ग्रुप अ‍ॅडमीनसह तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. या काळात सोशल मीडियावर अफवा पसरु नये असे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश आहेत. असे असतांनाही एका तरुणाने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये ‘दुकाने उघडण्याची सरकारने परवानगी दिली आहे’ अशी अफवा पसरवली. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीसात एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अफवा पसरवणारा मैसेज वायरल करणाऱ्या व व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमीन या दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर अनेक व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमीन कडून ॲडमीन ओन्ली सेट करण्यात आले होते. मात्र काही दिवसांचा काळ लोटताच पुन्हा ग्रुप सेंटींग पुर्ववत होत असल्याचे दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!