बीड जिल्ह्याला दिलासा; आजचे सर्व अहवाल निगेटिव्ह,

बीड दि.१४(प्रतिनिधी) आज जिल्ह्यातून १३६ स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्याची धाकधुक वाढली होती. सर्वच्या सर्व १३६ अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
शासन निर्णय नुसार बाहेर जिल्ह्यातील लोक जिल्ह्यात येण्यास सुरू होताच कोरोना बाधितांचा आकडा जिल्ह्यात वाढत होता. आरोग्य विभागाच्या योग्य उपचारामुळे अनेक रूग्ण बरे होऊन घरी गेले अवघे सहा बाधित रूग्ण राहीले होते. मात्र त्यानंतर पुन्हा दररोज एक दोन करत हे मिटर सुरू झाले. त्यानंतर शहरातील मसरत नगर मध्ये सहा आणि त्यांच्या संपर्कात क्रेन चालक दोन असे आठ रूग्ण मिळाले. हे रूग्ण आनेकांच्या संपर्कात आल्याने जिल्ह्याची धकाधाकु वाढली होती. त्यात पुन्हा पालकमंत्री ना. धनंजय मुंडे कोरोना बाधित असल्याचे चाचणीत निष्पन्न झाल्याने जिल्हाधिकारी आणि त्या पाठोपाठ पोलीस अधीक्षक ही सेल्फ कॉरन्टाईन झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली होती. तर रविवारी पुन्हा जिल्ह्यातून १३६ थ्रोट स्वॅब अंबाजोगाई येथे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. स्वॅबची संख्या जास्त असल्याने सर्व जिल्हा वासियांचे अहवालाकडे लक्ष लागले होते तर प्रत्येकाच्या मनात काय अहवाल येणार याची भीती होती. मात्र याचे अहवाल दिलासादायक आले असून सर्वच्या सर्व म्हणजे १३६ अहवालही निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यास मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.