भाषण नको-रेशन द्या सिटु संघटनेचे आंदोलन
२१ एप्रील निषेध दिन

किल्लेधारूर दि.२१(वार्ताहर) आज संपुर्ण जगामध्ये कोरोना मुळे खुप मोठे संकट निर्माण झाले आहे. या मुळे गोरगरीब जनतेला मोठा फटका बसला आहे. त्याचाच भाग म्हणून सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स ( सिटु ) या संघटनेच्या वतीने महाराष्ट्रात सामाजिक बांधीलकी सोशल डिस्टंटींगचे पालन करून आपल्या घरासमोर व संघटनेच्या ऑफीस मध्ये आज शासनाच्या विरोधात निषेध नोंदवला असल्याची माहिती सिटु संघटनेचे जिल्हा सचिव कॉ. डॉ. अशोक थोरात यांनी दिली.
या बाबत सविस्तर असे की, देशामध्ये कोरोना मुळे लोक भयभित झाले आहेत. उद्योग बंद पडले आहेत. बेरोजगारी वाढली आहे. केंद्र शासन फक्त घोषणा करीत आहे. आशा, अंगणवाडी, बांधकाम कांमगार, शालेय पोषण आहार कांमगार, शेतकरी शेतमजुर, अॅटो रिक्षावाले, हेअर सलुनवाले इत्यादी सह अनेक कामगारावर आज मितिस उपासमारीची वेळ आली आहे. आज दिं. २१ एप्रील २०२० हा दिवस सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटु) च्या वतीने सोशल डिस्टंटींग चे पालन करून भाषण नको – राशन द्या, भाषण नको – वेतन द्या, अशा घोषणांचे फलक दाखवत आयकर लागु नसणाऱ्या असंघटीत कामगांराना ७५०० रुपये त्यांच्या बँक खात्यात टाका, आशा , अंगणवाडी, शालेय पोषण आहार, बांधकाम कांमगार यांच्या मानधनात वाढ करा, स्थांलतरीत मजुरांना अन्नधान्याची व निवाऱ्याची सोय करा इत्यादी मागण्या केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून आज धारूर सिटु संघटनेच्या वतीने निषेध नोंदवला आहे. यामध्ये सिटु जिल्हा सचिव कॉ.डॉ.अशोक थोरात यांच्यासह मिरा शिंदे, वैशाली आडसुळ, लता खेपकर, इंदुताई खेपकर, सुमित्रा डोईफोडे, कौशल्या शिंदे, सुजाता पिंपळे इत्यादी उपस्थीत होते.