माझं गाव

Former corporator… माजी नगरसेविका कमलबाई नागनाथ सोनटक्के यांचे निधन.

58 / 100 SEO Score

किल्लेधारुर दि.17 नोव्हेंबर – Former corporator… ज्येष्ठ पत्रकार नागनाथ सोनटक्के यांच्या पत्नी माजी नगरसेविका कमलबाई नागनाथ सोनटक्के (वय 70) यांचे बीड येथे उपचार सुरु असताना निधन (passed away) झाले. त्यांच्या पार्थिवावर सहयोगनगर बीड येथे आज दि.17 शुक्रवार रोजी दुपारी 1 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

धारुर (Dharur) येथील बाराभाई गल्ली येथील निवासस्थानी दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या पुर्वसंध्येस त्यांना हृदयविकाराचा धक्का आला होता. त्यांना उपचारासाठी बीड येथे हलविण्यात आले. मात्र आज दि.17 शुक्रवारी पहाटे 5 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत (passed away) मावळली. त्या अत्यंत साध्या, सरळ व मितभाषी स्वभावाच्या होत्या. 1992 मध्ये त्या काँग्रेसकडून धारुर (Dharur) नगर परिषदेत नगरसेविका (Former corporator) म्हणून निवडून आल्या होत्या. त्या शहरातील अत्यंत नावाजलेल्या साप्ताहिक गुराखीचे संपादक ज्येष्ठ पत्रकार नागनाथ सोनटक्के यांच्या सुविद्य पत्नी होत. त्यांच्या निधनामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, तीन मुली, सुन, नातवंड असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!