माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे निधन

दिल्लीः दि.३१ आगस्ट- भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न  प्रणव मुखर्जी यांचे ८४ वर्षी दिल्ली येथील रुग्णालयात निधन झाल्याची माहिती त्यांचे चिरंजीव अभिजीत मुखर्जी यांनी ट्वीट करत दिली.

प्रणव मुखर्जी (११ डिसेंबर, इ.स. १९३५- ३१ अॉगस्ट २०२०) यांना दि.१० अॉगस्ट रोजी दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुखर्जी हे कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले होते. उपचारासाठी दिल्लीतील आर. आर. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली होती. प्रणव मुखर्जी यांनी आज दि.३१ अॉगस्ट सोमवारी सांयकाळी ८४ व्या वर्षी अंतिम श्वास घेतला. प्रणव मुखर्जी हे भारतीय प्रजासत्ताकाचे १३ वे राष्ट्रपती होते. राष्ट्रीय राजकारणात इ.स. १९६९ पासून सक्रिय असणारे मुखर्जी ह्यापूर्वी अनेक भारतीय केंद्र शासनांमध्ये कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीस उभे राहण्या अगोदर यांनी कॉंग्रेस पक्षामधून राजीनामा दिला. भारतीय राजकारणा मधील अमूल्य सेवेसाठी त्यांना भारत सरकारने इ.स. २००८ साली पद्मविभूषण पुरस्कार दिला. भारत सरकारने ८ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!