माता वासवी कन्यका परमेश्वरी जन्मोत्सव घरीच साजरा करा- डुबे

किल्लेधारूर दि.३०(वार्ताहर) आर्य वैश्य समाजाची कुलस्वामिनी माता वासवी कन्यका परमेश्वरी मातेचा दि.३ मे रोजी जन्मोत्सव साजरा होत असून तो घरात राहून साजरा करावा असे आवाहन आर्य वैश्य समाजाचे जिल्हाध्यक्ष गजानन डुबे यांनी केले आहे.

दि.३ मे वैशाख शुध्द १० रविवार रोजी वासवी कन्यका परमेश्वरी मातेचा जन्मोत्सव साजरा होत आहे. यंदा जगावर कोरोना वायरसमुळे संकट कोसळले आहे. यावर मात करण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन आहे. पारंपारिक रित्या मोठ्या उत्साहात साजरा होणारा जन्मोत्सव यंदा समाजबांधवांनी सकाळी ९ ते १२ पर्यंत घरातच महापुजन करुन जन्मोत्सव साजरा करावा. यावेळी मातेसमोर जगासह, देशावर, राज्यावर व आपल्या कुटूंबावर आलेल्या कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी साकडे घाला. असे आवाहन आर्य वैश्य महासभेचे जिल्हाध्यक्ष गजानन डुबे यांनी केले आहे. यावेळी कार्याध्यक्ष महेश रुद्रवार, सचिव संजीव डुबे, सुमित रुद्रवार, दत्तात्रय दमकोंडवार महासभेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!