मोठी बातमी – धनंजय मुंडेना कोरोनाची लागण

बीड– दि.१२(प्रतिनिधी) राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकासह अन्य कर्मचारीही बाधित असल्याचे समोर आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मुंडे सहभागी झाले होते.
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून यातून राज्याचे मंत्रीही सुटत नसल्याचे दिसत आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना करोनाची लागण झाली होती. या दोन्ही मंत्र्यांनी करोनावर मात केली. आता राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त येत असून काही वेळात याबाबत अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.