मोफत तांदूळ वाटपात स्वस्त धान्य दुकानदारांची तारेवरची कसरत;
अन्नसुरक्षा, अंत्योदय लाभधारकांनाच तांदुळ

किल्लेधारूर दि.१३(वार्ताहर)केंद्र सरकारने संकटातील लोकांना मदत म्हणुन स्वस्त धान्य दुकानातून तांदुळ वाटपाची योजना सुरू केली असली तरी या योजनेत सरसगट लोकांना घेण्यात आलेले नाही. केवळ अन्नसुरक्षा आणि अंत्योदय याच लाभार्थीचा समावेश आहे, शेतकरी कार्ड धारकांना हा तांदूळ नाही, शिवाय एपीएल कार्डधारकांना ही शासन धान्य देणार होते ते न आल्यामुळे मात्र या संदर्भात फार मोठे गैरसमज निर्माण झाले असून स्वस्त धान्य दुकानदारांना जिवघेणी कसरत करावी लागत आहे.
कोरोना या संकटात विविध योजने खालील लाभार्थी यांना केंद्र सरकारने मोठया प्रमाणावर धान्य उपलब्ध करुन दिले. त्याचे वितरण जोमाने चालू आहे. नियमीत धान्या शिवाय केंद्राने तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेतला. त्याचे वाटप सुरू आहे , मात्र मोफत तांदुळ कोणत्या लाभार्थीना आहे हे कोणी समजून घेत नसल्याने दुकानदारांची अडचण वाढली आहे. मुळात हा तांदुळ केवळ अन्नसुरक्षा ( पिवळे कार्ड ) आणि अंत्योदय योजना लाभार्थी आहेत त्यांच्या साठीच आहे. शेतकरी कार्ड अथवा इतर साठी तांदुळ नाही, मात्र या संदर्भात मोठया प्रमाणावर गैरसमज वाढले असून अनेक संकटाचा दुकानदारांना सामना करावा लागत आहे. शिवाय शासनाकडून एपीएल कार्डधारकांना ही धान्य उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाल्यामुळे अशा कार्डधारकांनाही आपले धान्य दुकानदार देत नसल्याबाबत गैरसमज निर्माण होत आहेत. मुळात हि योजनाच समजावून घेता राजकारणी पुढारी सुध्दा गैरसमज वाढतील अशी पत्रके , काढत आहेत. महसुल यंत्रणेवर सुद्धा तणाव वाढला आहे. नियमीत मासीक धान्य वाटप करतांना मोफतचा तांदुळ डोकेदुखी ठरू लागला आहे. खऱ्या लाभार्थीनीच या योजनेचा फायदा द्यायला हवा हे मात्र नक्की. ऐकिकडे स्वस्त धान्य धान्य दुकानदार जिव धोक्यात
घालून काम करत असतांना विनाकारण संशयाचे वातावरण वाढत आहे. शासनाकडून अंतोदय, एपीएल शेतकरी आणि अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत सतत बारा महिनेही शिधा पुरवठा केला जातो. मात्र धारूर तालुक्यांमध्ये याबाबत तक्रारीचे प्रमाण अतिशय नगण्य असून कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर दुकानदारांकडून अन्नधान्य सुरळीत वितरित होत आहे. फक्त गैरसमजातून दुकानदार हैराण झाले असुन खरे लाभार्थी वंचित राहत असल्यास त्यांनी पुरवठा विभागाशी संपर्क करावा. अशा दुकानदारावर तात्काळ निलंबनाची कार्वाही केली जाईल अशी माहिती नायब तहसीलदार सुहास हजारे यांनी दिली आहे.